लातूर पोलिसांची कारवाई
लातूर : स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, मोजे अंबुलगा बु येथे पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीमधून प्रतिबंधीत व संरक्षित चंदन वृक्षाची लाकुड चोरी करुन चोरटी विक्री करण्यासाठी घेवुन जात आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील सपोनी प्रवीण राठोड व पोलीस हवालदार चंद्रकांत भिमराव डांगे, नवनाथ हासबे, माधव बिलापट्टे, मोहन सुरवसे पोलीस अंमलदार तुराब पठाण यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन व सूचना देऊन रवाना केले. सदर पथकाने नमूद ठिकाणी सापळा लावला तेव्हा रात्री 21.30 वा. सुमारास मौजे अंबुलगा बु येथे सचिन शिवदास माने हा घरासमोर गाडीमध्ये चंदनाचे लाकडे घेऊन विक्री करण्यासाठी जात आहे. खात्रीशीर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने स्कार्पियो क्रमांक एम एच 14 सी एस 1944 गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये मागील बाजूस वृक्षतोड करण्यासाठी प्रतिबंधित व संरक्षित चंदनाची साल काढून तसलेला चंदनाचा गाभा दोन पोते लाकडे व धपसालीकडे असलेले लाकडे मिळून आले. सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सचिन शिवदास माने वय 29 वर्ष रा. अंबुलगा बु ता. निलंगा जि. लातुर असे असल्याचे सांगुन त्याने वेगवेगळ्या ठिकाणाहुन आलेला माल तो त्याचे स्वतःच्या घरासमोर ठेवत असल्याची माहिती दिली. वरील कारवाई 130 किलो चंदन अंदाजे किंमत 3 लाख 40 हजार रुपये आणि स्कार्पिओ वाहन असे एकूण 7 लाख 40 हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार चंद्रकांत भिमराव डांगे यांचे फिर्यादीवरून औराद शहाजानी य
ेथील पोलीस
ठाण्यात अंबुलगा बु
येथील सचिन शिवदास माने
याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 210/2024 कलम 379, 34 भादवी, कलम 41 42 भारतीय वन अधिनियम 1927 व कलम 04 महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम प्रमाणे
दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.