लातूर : मराठवाड्यातील सुप्रसिध्द समाजवादी विचारवंत ॲड. मनोहरराव गोमारे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सुप्रसिध्द राजकीय विश्लेषक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते प्रा. योगेंद्र यादव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा. योगेंद्र यादव ‘भारतीय लाकशाहीसमोरील आव्हाणे व भवितव्य’ या विषयावर गुंफणार आहेत. शनिवार 21 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:00 वाजता. स्व. दगडोजीराव देशमुख सभागृह, मार्केट यार्ड, लातूर येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. याच कार्यक्रमात सामाजिक कार्यामध्ये राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्यास ॲड. मनोहरराव गोमारे यांच्या नावे पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. यावर्षीचा प्रथम पुरस्कार भारतातील सुप्रसिध्द राजकीय विश्लेषक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते प्रा. योगेंद्र यादव यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख पन्नास हजार रू., स्मृती चिन्ह व गौरवपत्र असे आहे.
डॉ. जनार्दन वाघमारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असून दिलीपरावजी देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन विचारमंचाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. नागोराव कुंभार, प्रा.डॉ. सोमनाथ रोडे, डॉ. बी. आर. पाटील, ॲड. उदय गवारे, भाऊसाहेब उमाटे, सुर्यकांत वैद्य, प्रा. सुधिर अनवले, डॉ. गणेश गोमारे, माधव बावगे, संजय मलवाडे, पांडूरंग देडे, प्रा. दत्ता सोमवंशी, उत्तरमेश्वर बिराजदार, दिलीप आरळीकर यांनी केले आहे.
