हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी गावात नाल्यांची सफाई केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
हाळी गावातील नाल्या गच्च भरल्या होत्या. त्यामुळे काही भागात नाल्यांचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. नाल्या तुंबल्याने दुर्गंधी पसरली होती. डासांचे प्रमाण वाढले असल्याने आजाराची भिती होती. ग्रामपंचायतीने नाल्यांची स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले आहे. हाळी गावातील नाल्यांची सफाई झाली नव्हती. अण्णा भाऊ साठे नगर, अहिल्यादेवी होळकर चौक, भिम नगर, महेबुब नगर, नई आबादी आदी ठिकाणी नाल्या तुंबल्या होत्या. मात्र सध्या नाल्यांची स्वच्छता केली जात आहे. तसेच नात्यातील निघालेली घाण कचरा ट्रकटरच्या साह्याने भरून टाकला जात आहे. गावातील सर्व नाल्यांची सफाई करण्यात यावी तसेच ही सफाई थातूरमातूर न करता चांगल्या पद्धतीने करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
- कचराकुंडीची मागणी – गावातील काही अविचारी लोक नाल्यातच कचरा, शिळे अन्न, घाण टाकत आहेत. त्यामुळे नाल्या जागोजागी तुंबल्या जात आहेत. ग्रामपंचायतीने जागोजागी कचराकुंड्या बसवण्याची मागणी होत आहे.
