केंद्रातून नंदिनी जाधव प्रथम
लातूर : कै निवृत्तीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ भाकसखेडा (प.) द्वारा संचालित स्वामी दयानंद सरस्वती विद्यालयाचा इयत्ता १० वी मार्च 2024 बोर्डाचा निकाल 100 टक्के लागला आहे.
यामध्ये विशेष प्राविण्यामध्ये 19 विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये 20 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीमध्ये 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व प्रथम जाधव नंदिनी संभाजी 96 टक्के, द्वितीय बुर्ले अयोध्या राजेंद्र 92.40 टक्के तर तृतीय कांबळे मेघराज धोंडीराम 87.20 टक्के घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. तसेच शेख सुमेरा अमीरपाशा 86.80 टक्के, कांबळे ऊषाराणी नामदेव 86.80 टक्के, कांबळे अंकिता अमृत 86.80 टक्के, वाघमारे अनुजा बबन 85.40 टक्के, तेलंगे रुपेश लक्ष्मण 85.40 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष अँड बी.एन.बंडगर, उपाध्यक्ष डॉ. डी.के.रूपनर, सचिव पी.एन. बंडगर, प्राचार्य प्रभाकर तांबे, गायकवाड, काळे, केदार, कोळी, होळकर, वाडीकर, जाधव, बुर्ले, मोरे, तेलंगे सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

