लातूर- जीवन विकास प्रतिष्ठान संचलित सौ सुशिलादेवी देशमुख निवासी मुलींचे मूकबधिर विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 96 टक्के लागला आहे.
विद्यालयातून एकूण 25 विद्यार्थिनी पैकी 1 विद्यार्थिनी परीक्षेस अनुपस्थित राहिली उर्वरित 24 विद्यार्थिनी पैकी विशेष श्रेणी 13 प्रथम श्रेणी 11 मध्ये उत्तीर्ण झाले. वैष्णवी हेंकरे या विद्यार्थिनीने 93.60 टक्के घेऊन प्रथम तर कुमारी सानिया पठाण या विद्यार्थ्यांनी 84.20 टक्के घेऊन द्वितीय तसेच कुमारी वैष्णवी मलिषे या विद्यार्थिनींने 83.89 टक्के घेऊन तृतीय स्थान मिळविले. या सर्व यशस्वी विद्यार्थिनींना शाळेच्या प्र. मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक जी. बी. वाघमारे, सूर्यवंशी ए. डी, माद्रप स्वाती, बी. एम. पवार, शिंदे एस. सी. , आर. बी. काटे, एस. पी. इंडे, आर. एम. सुडे व बी. के. मोकाशे यांनी मार्गदर्शन केले आहे. यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे मार्गदर्शक आमदार अमितभैया देशमुख, जीवन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयसिंगराव देशमुख, डॉ चेतन सारडा, ललितभाई शहा, अभय शहा, संजय निलेगावकर, पी. व्ही.कुलकर्णी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, वैसाका राजु गायकवाड, सहाय्यक सल्लागार बालासाहेब वाकडे यांनी अभिनंदन केले आहे.