संजय राजुळे व गंगाधर डिगोळे यांना बिदर जिल्हा वारकरी परिषदेचा समाजरत्न व पत्रकार रत्न पुरस्कार जाहीर

0
196

भालकी : राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या बिदर जिल्हा वारकरी महोत्सव समितीच्या वतीने दिला जाणारा समाजरत्न पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते संजय राजूळे तर पत्रकार रत्न पुरस्कार दै. अदिती एक्सप्रेसचे संपादक गंगाधर डिगोळे यांना जाहीर झाला आहे. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 10 व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष निवृत्ती दास महाराज हल्लाळीकर यांनी जाहीर केले आहे. 20 डिसेंबर 2023 रोजी भालकी येथील भालकेश्वर मंदिर प्रांगणात कर्नाटक राज्याचे पर्यावरण मंत्री तथा बिदर जिल्ह्याचे पालकमंत्री ईश्वर खंडरे यांच्या हस्ते व माजी आमदार मोतीराम मुळे, उद्योजक नंदकुमार साळुंखे, माजी सभापती किशनराव पाटील इंचुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here