रेणापूर : शुक्रवारी शेतकरी संघटनेच्या वतीने रेणापूर तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन व घोषणा करण्यात आली. दुष्काळी अनुदान व विमा व उसाचा भाव 3100 रुपये प्रमाणे काढावा या मागणीसाठी हे आंदोलन उभारले होते. ज्या शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान आले आहे त्यांची केवायसी करून देखील एक महिना होऊन गेला तरी पैसे पडत नाहीत याची कारणे काय हे सर्व कारण लेखी स्वरूपात द्यावी. गावत किती अनुदान पडलं किती लोकाला पडलं नाही याची शहानिशा तलाठ्यांनी गावागावात जाऊन करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 10 जून रोजी रेणापूर तहसील कार्यालयाला टाळे ठोकून पिंपळफाटा रेणापूर येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा किसान सेनेचे व शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गजानन भिवाजी बोळंगे यांनी दिला आहे. सोबत रेणापूर तालुका अध्यक्ष सचिन निकम पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब भंडारे, संपर्कप्रमुख दत्ताजी शिंगडे, तालुका उपाध्यक्ष अच्युत निवृत्ती रावकर मुळे व शेतकरी गोवींद माने, उपसरपंच खलंग्री ज्ञानोबा वाघमारे, दिलीप बोकडे सोपानराव, रामराव लहाने माकेगाव, रेणापूर तालुका अध्यक्ष सचिन निकम, पाटील अशोक, आगरकर ज्ञानोबा, काळे देशमुख, निशांत अरविंद घाडगे, कुंभारवाडी विठ्ठल एलाले, तुकाराम येलाले, प्रशांत गाडगे ईश्वर बंडापल्ले यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.



