लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघ इंडीया व महाविकास आघाडीचे नुतन खासदार डॉ शिवाजी बंडाप्पा काळगे यांचा सत्कार शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शेकापने खंबीरपणे आघाडीचे उमेदवार डॉ काळगे यांच्या पाठीशी उभे राहून विजयात मोलाची भर घातली ,एवढेच नाही तर लोहा कंधारचे शेकापचे आ.शामसुंदर शिंदे यांनी मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहे.खासदारांचे पिताश्री भाई बंडाप्पा काळगे हे शेकापचे ज्येष्ठ नेते असुन सत्तरच्या दशकात भाई उध्दवराव पाटील यांच्या लातूर लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विजयसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
नुतन खासदार डॉ काळगे यांचा सत्कार शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हा चिटणीस भाई उदय गवारे यांनी केला.या प्रसंगी भाई बंडाप्पा काळगे,प्रा. दत्ता सोमवंशी, भाई एकनाथराव कवठेकर,भाई सतीश देशमुख, डॉ.अदिमाया गवारे, अँड भालचंद्र कवठेकर,प्रा.रमेश पारवे, भाई अनिल सिध्दे, भाई शिवाजी लोखंडे आदी उपस्थित होते.
