लातूर – शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रेणापूर तालुक्यातील वसंत नगर येथील दोन्ही हात नसलेला विद्यार्थी गौस बारावीच्या परीक्षेमध्ये 78 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने महिला आघाडी यांच्या वतीने गौस व त्यांचे आई-वडील त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक या सर्वांचा सत्कार शाल फेटा श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी
माजी उपजिल्हाप्रमुख विष्णू साबदे, शहर संघटक संतोष पाटील, वाहतूक सेना रोहित जाधव, महिला आघाडी शहर प्रमुख मीनाक्षीताई मुंदडा, विधीज्ञ पुनम गिरी, विधीज्ञ हर्षला भटमुळे, मीरा पांचाळ, पुष्पाताई तोंडारे, मनीषा पाटील इतर शिवसेनेचे महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. गौस यांचे वडील अमजद शेख. आई रजिया शेख, मसुरे एम टी, कांदेवाड एस व्ही, धावरे हनुमान इत्यादी उपस्थित होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले, गौस शेखने जिद्दीच्या बळावर मेहनतीवर यशाचं उत्तुंग शिखर गाठालं यात कसली शंका नाही. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे शिवसेनेचे सर्व नेते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. ज्या ठिकाणी अडचण येईल त्या ठिकाणी शिवसेना आपल्या मदतीला धावून येईल. आपण उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्याकडून मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत व पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा .
