लातूर : लिंगायत शरण फाउंडेशन (महा.) यांच्या वतीने महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा मंगळवारी भालचंद्र ब्लड बँक सभागृहात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मंत्री बसवराज पाटील मुरूमकर साहेब, प्रमुख पाहुणे मा.उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, सत्कारमूर्ती संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे , सं.उपाध्यक्ष माधवराव पाटील, सं.सचिव माधवराव पाटील (टाकळीकर), सं.सहसचिव सुनील मिटकरी, सं.कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर, सं.कार्यकारी संचालक श्री प्रदीपजी दिंडीगावे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
