लातूर : संपूर्ण महाराष्ट्रात खरीप हंगामाच्या मशागती करण्यासाठी बळीराजा सरसावला आहे.खरीप 2024 हंगागामध्ये लातूर जिल्ह्यात किती बियाण्यांची आवश्यकता आहे. तेवढे बियाणे उपलब्ध आहे काय.शासन घरचे बियाणे पेरण्यासाठी आग्रह धरत आहे.याचा अर्थ बियाणांचा तुटवडा आहे काय ? कृषि मंत्री आकडेवारीत लपवत आहेत काय ? अवध्या काही दिवसावर मान्सून येऊ पाहत आहे.त्यासाठी शेतकरी कुटुंबीय आपल्या काळ्या आईच्या मशागतीत गुंतला आहे.सरकारच्या योजनेप्रमाणे 10 जुन पुर्वी खालील मागण्याच्या पुर्ततेसंबंधी कार्यवाही करावी
1) शासनाने खरीपासाठी बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्यावे.
2) सन 2023 या वर्षीचा पिक विमा तात्काळ वाटप करण्यात यावा.
3) चारा, पाणी जनावरांसाठी तात्काळ उपलब्ध करून द्यावा.
4) वन्य प्राण्यापासून होत असलेल्या नुकसानीचे पंचनामे करा.
5) मराठवाडा व सोयाबीनचा पेरा सर्वांत जास्त असताना लातूर जिल्ह्यात सोयाबीन संशोधन केंद्र उभारण्यात यावे.
6) ग्रामीण भागामध्ये तात्काळ पिण्याचे पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात यावेत.
अशा विविध मागण्यांचे निवेदन लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना देवून तात्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष
संजय शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेल्या निवेदनावर जिल्हा कार्याध्यक्ष रशिद शेख,प्रदेश सचिव मदनआबा काळे,लातूर तालुकाध्यक्ष बकतावर बागवान,युवक प्रदेश सचिव प्रा.प्रशांत घार,प्रदेश उपाध्यक्ष ॲड.निशांत वाघमारे,
श्रीकांत मगर,चन्द्रशेखर कत्ते,पुरुषोत्तम पाटील,डी उमाकांत,ॲड.नारायण नागरगोजे,काकासाहेब भगाडे,
पांडुरंग बेंबडे,नवनाथ शिंदे,रोहन पाटील,ॲड.आशिष साठे,कैलास मगर,माऊली रणदिवे,संतोष मगर,अजय भगाडे,शेख मारुफ,शंकर घोडके,ॲड.आशिष चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
