25.5 C
New York
Monday, July 7, 2025

शासनाने एफ.आर.पी. वाढवली पण साखरेचे दर वाढवले नाहीत – माजी मंत्री दिलीपराव देशमुख 


जागृति शुगर चा १३ वा गळीत हंगामाचा शुभारंभ

लातूर/ देवणी: केंद्र शासनाने एफ.आर.पी.चे दर वाढवले पण साखरेचे व ऊत्पादीत मालाच्या भाववाढीत खोडा घालण्याचे काम सरकारने कौशल्याने केले असल्याचे जागृती शुगरचे संस्थापक चेअरमन तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली. ते देवणी तालुक्यातील तळेगाव येथील  जागृती शुगर ॲड अलाईड ईंडस्ट्रिजच्या १३ व्या गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी ते रवीवारी बोलत होते
या प्रसंगी व्यासपीठावर जागृतीचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण मोरे, रेणाचे माजी चेअरमन आबासाहेब पाटील, जिल्हा बॅकेचे संचालक दिलीप पाटील नागराळकर, गजानन भोपनीकर, मांजरा परिवाराचे माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी, सुग्रीव लोंढे, सोनू डगवाले, मालवा घोनसे, बालाजी बोंबडे यांची प्रमुख ऊपस्थीती होती या वेळी बोलतांना माजी मंत्री दिलीपराव देशमूख म्हणाले की सध्याचे शासन शेतक-यांच्या हितासाठी ऊदासीन भुमीकेत असून एकीकडे एफ आर.पीचे भाव वाढवाचे मात्र दूसरीकडे साखरेचे दर मात्र वाढवायचे नाहीत सोयाबीन सह ऊत्पादीत मालाची  भाववाढीत खोडा घालण्याचे कार्य सत्ताधारी शासन  करीत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले
जागृतीने एफ आर.पी.पेक्षा 72 कोटी रूपये जास्तीचे देऊन जागृतीच्या सभासद  शेतक-यांना दिले व शेतक-यांसह परीसरातील देवणी ऊदगीर, निलंगा शि.अनतपाळ तालूक्यातील बाजारपेठेसह  शेतमजूर कामगारांच्या जीवनात अर्थीक क्रांती केली आहे. त्यामुळे या भागांतील शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना मोठी आर्थिक सुबत्ता देण्याचे काम जागृति शुगर च्या माध्यमातून झालेले आहे पुढेही होईल यात शंका नाही असेही ते यावेळी म्हणाले.
या वेळी जागृतीला जास्ती जास्त ऊस पुरवठा करणा-या    शेतक-यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला यामध्ये पाटील शकूंतला दिलीप साकोळ यांनी सर्वाधिक ९०५ मे टन ऊस पुरवठा तर द्वितीय ईटकर सुभाष भिमरार घुग्गी  ८६५ मे.ट. हार्वेस्टर द्वारे मोरे मधूकर श्रीपतराव चलबुर्गा यांनी  १६०८०० मे.टन.ऊस देऊन
१ कोटींचा व्यवसाय केले तर ट्रकच्या माध्यमातून जाधव विजय गंगाधर यांनी २९४०  मेट्रीक टन
बिरादार,आकाश चद्रेशेखर हाणमंतवाडी  २४४१,मे ट.
पवार गणेश ऊत्तमराव ४२६०मे ट.ऊस जाधव लखन शिवाजी मुबारकपूर ३२२५ मे. टन  लहाण ट्रॅक्टर मध्ये
चव्हाण शेषेराव हिरामन ३०८४ मे ट. ऊस पुरवठा करणा-या ऊस पुरवठा करणा-या   पुरवठा दारांचा  सत्कार करण्यात
आला. यावेळी जागृती शुगर ने घेतलेल्या नूतन चार हार्वेस्टर चे पूजन. माजी मंत्री सहकार महर्षी जागृती शुगर चे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख साहेब व अन्य मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक प्रकल्प व्यवस्थापक   येवले जी जी.यांनी केले मागील वर्षी जागृतीने  दैनंदिन ५००० मे.ट.गाळप करून  ७ लाख  २ हजार मे.ट. गाळप केले दर २७६५  रूपये,भाव दिल्याचे सांगीतले दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उस उत्पादक शेतकऱ्यांनी जागृती शुगर कडे उस गाळपास द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी आभार प्रा. भगवान गायकवाड यांनी व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles