शहरातील पथ विक्रेत्यासाठी समिती सकारात्मक काम करेल – आयुक्त मानसी  

0
214

लातूर : लातूर शहर महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY- NULM ) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या शहर पथ विक्रेता समितीची बैठक महानगरपालिका स्थायी सभागृहात आज दिनांक १३.०८.२०२५ रोजी आयुक्त श्रीमती मानसी  यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

          बैठकीत प्रथम उपस्थित सर्व सदस्यांनी आपली ओळख करून दिली आणि सर्व सदस्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. उपस्थित सदस्यांनी शहरातील फेरीवाले यांचेसाठी काही विशेष काम करावे, समिती सदस्य सुपर्ण जगताप यांनी शहरातील फेरीवाले यांच्या संदर्भात छत्रपती संभाजीनगर मनपाने केलेल्या कार्यवाहीचा विचार करून त्याप्रमाणे आपल्याला काही करता येईल का ते पाहावे असे सांगितले. इतर सदस्यांनी मागील बैठकीतील झोन केलेले याची माहिती द्यावी जेणेकरून त्यात काही सुधारणा सांगता येतील, असे मांडले. यावेळी आयुक्त यांनी समितीमध्ये नवीन सदस्य घेण्यात आलेले आहेत त्यात फेरीवाला क्षेत्र मध्ये निवडणुकीद्वारे व इतर अशासकीय संघटना, सेवाभावी संस्था या अशा विविध क्षेत्रामधून सदस्य घेण्यात आलेले आहेत त्यांची ही पहिलीच बैठक असल्याने आपण शहरातील फेरीवाले यांचे प्रश्न व अडचणीबाबत त्यांचे मत घेऊ आणि पुढील बैठकीमध्ये समितीकडून सकारात्मक व धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील, असे सांगितले.

          यावेळी बैठकीस उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी डॉ. पंजाब खानसोळे , पोलीस अधीक्षक प्रतिनिधी पोलीस उपनिरीक्षक सीमा बेद्रे, वाहतूक नियंत्रण शाखा पोलीस उपनिरीक्षक माधव केंद्रे , क्षेत्रीय अधिकारी संतोष लाडलापुरे ,समाधान सूर्यवंशी, अतिक्रमण विभागप्रमुख रवि कांबळे, वाहतूक नियंत्रण शाखा लक्ष्मण बिरादार , आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्था राजगोपाल बाहेती,माधव गायकवाड, सुनिता चाळक, सुपर्ण जगताप, आडत असोशिएशन चंद्रकांत सूर्यवंशी , फेरीवाले सदस्य गौस गोलंदाज, त्र्यंबक स्वामी, मनोज शिंदे, माजीद बागवान, दीपमाला तुपकर, उषा धावारे, वैशाली पडवळ हे उपस्थित होते.  शेवटी आभार शहर अभियान व्यवस्थापक लक्ष्मण जाधव यांनी मानले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here