औसा येथील पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये विद्यार्थ्यांनी केले सादरीकरण
लातूर : औसा येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासा व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारे ‘विज्ञान उत्सव ०.१’ हे विज्ञान प्रदर्शन उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध कार्यरत नमुने तसेच नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्प सादर करण्यात आले.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पोदार इंटरनॅशनल स्कूल, औसा येथील प्राचार्य अनिल साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. संतोष टोंडळगे उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत वैज्ञानिक दृष्टिकोन, नवकल्पना आणि प्रयोगाधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रदर्शनास पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे पालक व उपस्थितांनी भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग पाहून पालकांमध्ये समाधान व अभिमानाची भावना दिसून आली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्राचार्य अनिल साळवे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या शिक्षक व समन्वयकांचे अभिनंदन केले. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘विज्ञान उत्सव ०.१’ हे प्रदर्शन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा, सर्जनशीलता व नवविचारांना चालना देणारे एक यशस्वी उपक्रम ठरले.




