वास्तुशांतीचा कार्यक्रम उरकून गावाकडे परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला

0
254

चौघांचा जागीच मृत्यू

लातूर – उदगीर तालुक्यातील एकुरका रोड येथे वास्तुशांतीचा कार्यक्रम उरकून गावाकडे परत निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला असून कार व आयशरच्या झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तिघांची प्रकृती गंभीर असून जखमींना उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उदगीर तालुक्यातील दावणगाव येथील भंडे कुटुंब वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी एकुरका रोड येथे गेले होते. कार्यक्रम अटोपुन स्विफ्ट डिजायर कार क्रमांक एम. एच. ०२ बीएम ४४८२ मधून उदगीरकडे दुपारी दोनच्या सुमारास परत येत असताना एकुर्का ते इसमालपुर दरम्यान रस्त्यावर समोरुन येणाऱ्या आयशर क्रमांक एच. एच. २४ एयु. ४७५६
या दोन गाड्यांचा अपघात होवुन मंगलबाई जाधव, प्रणीता बिरादार, प्रतिभा भंडे, अनन्या भंडे (रा. दावणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला तर संजय भंडे, सई व अदिती भंडे या अपघातात गंभीर जखमी झाल्या. जखमींना उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने दावणगावात शोककळा पसरली आहे. या अपघाताची माहिती मिळताच वाढवणा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी उदगीरला पाठवून दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here