लातूर : दिनांक ०४/०६/२०२४ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ मतमोजणी प्रक्रिया महिला तंत्रनिकेतन, बार्शी रोड, लातूर येथे पार पडणार असल्यामुळे मतमोजणीचे ठिकाणी जिल्हयातून उमेदवार, पक्षाचे नेते, कार्यकर्ते व मतदान बुथ प्रतिनिधी यांचा मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्र जमा होतो. त्यामुळे सदर ठिकाणी वाहतुक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेच्या सोईच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने लातूर शहरातील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज ते पीव्हिआर चौक या मार्गावर वाहतुक बंद करून इतर मार्गाने वाहतुक वळविणे आवश्यक आहे.
दिनांक ०४/०६/२०२४ रोजी ०५.०० ते २०,०० वाजे पर्यंत मुख्य बार्शी रोडवरील पिव्हीआर चौक तं विडवं इंजिनिअरिंग कॉलेज पर्यतचा रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांना (मोटार सायकल, थ्री व्हीलर, एस.टी.बसेस, ट्रक, टॅम्पो, टॅक्सी, ट्रॅव्हल्स, मिनीडोअर इ.) वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहेत.
जनतेने खालील पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.
१) पी.व्ही.आर चौकातुन मुरुड-वार्शी कडे जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना (मोटार सायकल, श्रीव्हीलर, एस.टी.बसेस, ट्रक, टॅम्पो, टॅक्सी, ट्रॅव्हल्स, मिनीडोअर इ.) मुख्य बार्शी रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असून त्यांना पर्यायी मार्ग म्हणून पी.व्ही. आर. चौकातुन जुने रेल्वे लाईनच्या पॅरलल रोडकडे वळून जुने रेल्वे लाईनच्या पॅरलल रोडने मुरुड-वार्शीकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतील.
२) पिव्हीआर चौकातून फक्त मतमोजणी अधिकारी व कर्मचारी यांचीच वाहने मुख्य बार्शी रोडवरुन मा. जिल्हाधिकारी कार्यालय मधील पार्किंगकडे जातील.
३) निवडणुक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी, मा. जिल्हाधिकारी व मा. पोलीस अधिक्षक यांची बाहने महिला तंत्रनिकेतन येथील मतमोजणी ठिकाणी जातील.
४) बार्शी व मुरुड कडून लातूर शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना (मोटार सायकल, श्री व्हीलर, एस.टी. बसेस, ट्रक, टॅम्पो, टॅक्सी, ट्रॅव्हल्स, मिनीडोअर इ.) मुख्य बार्शी रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असून त्यांना पर्यायी मार्ग म्हणून बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज येथून जुने रेल्वे लाईनच्या पॅरलल रोडकडे वळून पॅरलल रोडने पिव्हीआर चौक किंवा औसाकडील रिंग रोडला जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतील.