लातूर : जननायक संघटना ही शेतकर्यांच्या व सामान्यांच्या प्रश्नावर गेल्या अनेक वर्षापासून काम करीत आहेत. शेतकर्यांचे सोयाबीन 4900 रूपये प्रमाणे खरेदी केंद्राने खरेदी करून भाव देण्याचे काम केले. सोयाबीनचे मॉईश्चर 12 टक्क्यावरून 15 टक्क्यावर आणले. सोयाबीनची 2 हेक्टरवरील क्विंटल मर्यादा 15 क्विंटलवरून 20 क्विंटलवर नेण्याचे काम केले. ऊसाला रिक्वरीप्रमाणे भाव देण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करून ते देण्याचे काम केले. याबरोबरच एमएसपीचा कायदा करावा, अशी मागणी केली. आता लातूरच्या औद्योगिक विकासावर लक्ष केंद्रीत केले असून शासनाने लातूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी लातूर जिल्ह्याला एसईझेड चा दर्जा देऊन नवीन उद्योग उभारण्यात यावेत, असे प्रतिपादन जननायक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा नेते किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी जननायक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्यावतीने आयोजित विशेष बैठकीत बोलत होते. यावेळी या बैठकीला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, जननायक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, जिल्हा कार्याध्यक्ष निळकंठराव पवार, जिल्हा उपाध्यक्ष बी.टी.कदम, जननायकचे युवा जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील कव्हेकर, बाबूराव पाटील, जननायकचे लातूर तालुका अध्यक्ष रविंद्र कांबळे, जननायक संघटना महिला आघाडीच्या नेत्या वनिताताई काळे, ज्योतीराम चिवडे, शिवराम कदम, राजेभाऊ मुळे, शोभाताई पाटील, महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा सहारा शेख, बळीराम पवार, तानाजी झुंजे, मंजूरखाँ पठाण, भूजंग पाटील, शिवराज बुलबुले, शिवाजीराव भिसे, केदार पाटील, बाळासाहेब जाधव, बळीराम बापू शिंदे, अप्पासाहेब पाटील, कव्ह्याचे उपसरपंच किशोर घार, भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रतापराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, लातूरातील सत्ताधार्यांनी ऊजनी धरणातून पाणी आणण्याच्या कामाचे भूमिपूजन 22 वर्षापूर्वी केलेे होते तरीही थेंबभर पाणीही त्यांना आणता आलेले नाही. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख यांनीही निवडून आल्यानंतर तीन महिण्यात पाणी आणू अन्यथा आहे त्या पदाचा राजीनामा देऊ असे आश्वासन दिल्यानंतर मंत्री पदावर विराजमान झाले. परंतु त्यांनी ऊजनीचे पाणी आणले नाही आणि आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही दिला नाही. असेही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यावेळी बोलताना म्हणाले.
आज देशामध्ये मोदी व राज्यामध्ये फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये शासन चांगले काम करीत आहे. त्या गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा विकास तेथील नेतृत्वावरून दिसून येतो. पंतप्रधान मोदीजींवर अध्यात्माचे संस्कार आहेत. त्यांनी देशाचा चौफेर विकास करण्याचे काम केले. त्यामुळे जगाच्या तुलनेत चीनपेक्षा जास्त प्रगती भारताची झालेली आहे. आज भारत पाचव्या क्रमांकावर आहे. येणार्या सहा महिण्यामध्ये तिसर्या क्रमांकावर येईल आणि 2047 मध्ये भारत चीनलाही मागे टाकून मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत महासत्ता बनून जगाचे नेतृत्व करेल असा विश्वासही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातील प्रमुख मान्यवरांचा सत्कार संयोजन समितीच्यावतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मारुती सूर्यवंशी यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अब्दूल गालीब शेख यांनी मानले. यावेळी या कार्यक्रमाला तुकाराम पवार, ज्ञानोबा उगीले, जाजू शेठ, ज्ञानेश्वर कदम, शिवराम गायकवाड, केदार पाटील, आनंदराव माने, पंडीतराव जाधव, बब्रूवान पवार, उध्दवराव जाधव, सुभाषअप्पा सुलगुडले, सौदागर पवार, गोविंदराव पंडगे, विरभद्र चिकटे, संजय पवार, राजेसाहेब देशमुख यांच्यासह जननायक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लातूरच्या विद्यापीठ उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करावे
यावेळी झालेल्या जननायकच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व लातूर जिल्ह्याचे नुतन पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या अभिनंदनाचा ठराव घेऊन लातूरच्या विद्यापीठ उपकेंद्राचे रूपांतर विद्यापीठामध्ये करण्यात यावे. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेमध्ये कायम करावे यासह अनेक महत्त्वपूर्ण ठराव मांडून त्याला जननायकच्या याबैठकीमध्ये एकमताने मंजूरी देण्यात आली.
जननायक संघटना राज्यामध्ये वाढविण्याचे काम करू – सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर
जननायक संघटना भाजपासोबत राहून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून करीत आहे. या कामाच्या जोरावर लोकसभा आणि विधानसभेमध्ये चांगले यश मिळविण्याचे काम केले. याबरोबरच शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी गावागावात शाखा उभारून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले. तसेच जननायक संघटना व श्री श्री रविशंकरच्या माध्यमातून जलसंधारणाची अनेक कामे मार्गी लावण्याचे काम केले. त्यामुळे जननायकचा नावलौकिक मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे यापुढील कालावधीतही सर्वांना सोबत घेऊन जननायक संघटना राज्यामध्ये वाढविण्याचे काम करू असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केले.
स्थानिक संस्थेच्या निवडणुका सर्वांना सोबत घेऊन लढविण्याचे काम करू – सूर्यकांतराव शेळके
जननायक संघटनेच्या माध्यमातून व भाजपा पक्षाच्या माध्यमातून कव्हेकर साहेब गेल्या अनेक वर्षापासून जनसेवेमध्ये कायम कार्यरत आहेत. 1995 मध्ये आमदार जनतेच्या दारी या उपक्रमातून सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्याचे काम साहेबांनी केले. याबरोबरच जनतेच्या प्रश्नासांठी कायम सेवेत राहून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम कव्हेकर साहेब गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत. त्यांच्याकडे पद असो की नसो ते कायम जनसेवेमध्ये राहतात. त्यामुळे त्यांच्या कामाची पावती जनतेमध्ये वेळोवेळी मिळत राहते. या पुढील कालावधीतही जनतेचे हीत लक्षात घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण सर्वांना सोबत घेऊन लढू असे प्रतिपादन जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके यांनी केले.
जननायक संघटनेच्या माध्यमातून व भाजपा पक्षाच्या माध्यमातून कव्हेकर साहेब गेल्या अनेक वर्षापासून जनसेवेमध्ये कायम कार्यरत आहेत. 1995 मध्ये आमदार जनतेच्या दारी या उपक्रमातून सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्याचे काम साहेबांनी केले. याबरोबरच जनतेच्या प्रश्नासांठी कायम सेवेत राहून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम कव्हेकर साहेब गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत. त्यांच्याकडे पद असो की नसो ते कायम जनसेवेमध्ये राहतात. त्यामुळे त्यांच्या कामाची पावती जनतेमध्ये वेळोवेळी मिळत राहते. या पुढील कालावधीतही जनतेचे हीत लक्षात घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण सर्वांना सोबत घेऊन लढू असे प्रतिपादन जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके यांनी केले.

