मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
लातूर : राज्यातील सर्व धर्मातील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लातूर लातूर जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिक 14 ऑक्टोबर रोजी रेल्वेने श्रीराम दर्शनासाठी अयोध्येला रवाना होणार आहेत.
या योजनेसाठी जिल्ह्यातून 937 अर्ज पात्र झाले आहेत. यापैकी 800 पात्र लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या लाभार्थ्यांसाठी पहिली रेल्वे श्रीराम मंदीर अयोध्या धाम येथे जाण्यासाठी लातूर रेल्वे स्टेशन येथून 14 ऑक्टोबरी 11 वाजता रवाना होईल, असे समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी कळविले आहे.