लातूर : व्ही.एस. पॅंथर्स युवा संघटन महाराष्ट्र राज्य व वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश मिळाले.
गेली अनेक वर्ष व्ही.एस. पॅंथर्स व सम्यक विद्यार्थी आंदोलन यांनी लातूर येथील १००० मुला/मुलींचे शासकीय वसतिगृहाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी अनेक निवेदने दिली होती. त्याचा पाठपुरवठा केला अखेर या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे व्ही.एस. पॅंथर्स विद्यार्थी आघाडीचे शहर अध्यक्ष अक्षय कांबळे, सुमित गोरे, सौरभ पाटील, संदेश गावंडे, प्रशांत रसाळ, अशोक गायकवाड, संघरत्न सोनटक्के, अभिषेक कलवले, प्रताप कलवले, अमोल दूधभाते आदी विद्यार्थ्यांनी सांगितले. या मिळालेल्या यशाबद्दल समाजकल्याणचे प्रादेशीक उपायुक्त देवशटवार यांचा मंगळवारी पुष्पगुछ देऊन सत्कार केला.
