20.3 C
New York
Sunday, July 6, 2025

लातूरचा प्रल्हाद सोमवंशी महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघात

लातूर :- महाराष्ट्र व्हॉलीबॉल क्लबचा युवा खेळाडू प्रल्हाद दत्ताभाऊ सोमवंशी याची जयपूर येथे ७ ते १३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
पुण्यातील चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून प्रल्हादची महाराष्ट्र संघात काऊंटर अटॅकर म्हणून निवड झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे महाराष्ट्र संघाचे सराव शिबिर ३० डिसेंबर ते ४ जानेवारी २०२५ दरम्यान होणार असून प्रल्हादला एन.आय.एस प्रशिक्षक महेश पाळणे, विजय सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रल्हाद ने यापूर्वी विविध वयोगटातील आठ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले असून पाच वेळा आंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. यासह खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली आहे. या यशाचे कौतुक लातूर विभागाचे क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, राष्ट्रीय खेळाडू मोईज शेख,राजेश खानापुरे,सुनील जाधव,लिंबराज बिडवे,पवन पाळणे,प्रवीण तावशीकर,दिनेश खानापुरे,विश्वजीत कासले, निलेश पौळ,पंकज पाळणे, विठ्ठल कवरे, नागेश जोगदंड, वंकुराम गायकवाड, संजय देशमुख,गणेश कोल्हे,विशाल वगरे,रणजीत राठोड, कृष्णा पोतदार, ललित जोशी यांच्यासह महाराष्ट्र क्लबच्या सदस्यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles