लातूर : भाजप प्रणित महाराष्ट्र सरकारने राज्यात अक्षरशः शिक्षणाचा खेळ खंडोबा केला असून, सरकारने दोन वर्षांपासून शिक्षण क्षेत्राशी निगडित घेतलेले असंख्य निर्णय हे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवत आहेत म्हणून हे सरकार बदलल्या शिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी संपणार नाहीत.असे आवाहन करत आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,लातूरच्या वतीने महात्मा गांधी चौक,लातूर येथे एकत्र येत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लातूर जिल्हाध्यक्ष चेतन पाटील यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी चौक लातूर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस मदन आबा काळे, लातूर तालुकाध्यक्ष बक्तावर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष निशांतजी वाघमारे,
युवक प्रदेश सचिव चंद्रशेखर कत्ते, जिल्हा समन्वयक डी उमाकांत, युवक सहसचिव खंडू लोंढे, विद्यार्थी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष बसवेश्वर रेकुळगे, विधी सेल जिल्हाध्यक्ष आशिष चव्हाण, विद्यार्थी जिल्हा सचिव प्रज्वल मस्के, जिल्हा सहसचिव सुमित धावारे, लातूर तालुका कार्याध्यक्ष मंथन जाधव, प्रणव आकडे, योगेश पडोळे तसेच इतर विद्यार्थी,पदाधिकारी उपस्थित होते.
