लातूर दि.२२- आयोध्येत श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर होणे आणि त्या मंदिरात मुर्तीची प्रतिष्ठापणा होणे हा क्षण स्वर्णअक्षरांनी लिहला जाणारा आहे. या निमित्ताने संपुर्ण देशभर मोठा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारे कणखर, विकसनशील नरेंद्रजी मोदी यांच्या रुपाने देशाला नेतृत्व मिळाले. या नेतृत्वाचा परिणाम आज देश आनंदाचा क्षण साजरा करीत आहे. अशा नेतृत्वाच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहीले पाहीजे असे प्रतिपादन परमपुज्य महंत रामकृष्ण शास्त्री महाराज यांनी आयोध्येतेतील राममंदिर मुर्ती प्रतिष्ठापणा सोहळया निमीत्ताने रामेश्वर येथील किर्तनातून बोलताना केले.


प्रदिर्घ संघर्षानंतर आयोध्या नगरीत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले असून या मंदिरात २२ जानेवारी सोमवार रोजी प्राणप्रतिष्ठापणा झाली. या निमीत्ताने लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर नगरीत भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य श्रीरामरथ शोभायात्रा काढण्यात आली. श्रीराम मंदिर येथून निघालेली श्रीरामरथ शोभायात्रा संत श्री गोपाळबुवा महाराजांच्या मंदिरापर्यंत जावून परत राम मंदिरात पोंहचली. या शोभायात्रेत ढोल ताशा, लेझीम पथक, झांज पथक, कलश घेतलेल्या महिला, टाळकरी, वारकरी, महिला, पुरुष मोठया संख्येने सहभागी झाले होते. बारा फूट उंचीच्या भव्य श्रीरामच्या मुर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होत. भगवे ध्वज घेवून असंख्य तरुणांचा सहभाग होता. जय श्रीराम, जय जय श्रीराम जयघोषाने संपुर्ण रामेश्वर नगरी दुमदुमली होती. या कार्यक्रामच्या निमीत्ताने अनेकांनी आपआपल्या घरावर भगवे झेंडे, पताके लावले होते तर काहींनी गुढया उभारल्या होत्या. शोभायात्रेच्या मार्गावर स्वागतासाठी रांगोळया काढल्या होत्या, अभुतपुर्व निघालेल्या श्रीरामरथ शोभायात्रेत भक्तीमय, उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण दिसून येत होते. शोभायात्रेचा समारोप परमपुज्य महंत रामकृष्ण शास्त्री महाराज यांच्या किर्तनाने झाला. किर्तनानंतर थेट प्रक्षेपणाद्वारे आयोध्येतील श्रीराम मुर्ती प्रतिष्ठापणा कार्यक्रमाचा उपस्थित भावीक भक्तांनी आनंद घेतला. यावेळी आ. रमेशअप्पा कराड आणि खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या हस्ते आरती करण्यात आली आरतीनंतर हजारो महिला पुरुषांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
शोभायात्रेसह सर्व कार्यक्रमास जेष्ठ मार्गदर्शक तुळशीरामअण्णा कराड, प्रगतशील शेतकरी काशीराम नाना कराड, संत गोपाळबुवा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन राजेश कराड, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, भागवत सोट, उद्योजक जगदीश कुलकर्णी, पत्रकार रामेश्वर बद्दर, महेंद्र जाधवर, रघुनाथ केंद्रे, भाजयुमोचे प्रदेश सचिव ऋषिकेश कराड, पृथ्वीराज कराड, राजवीर कराड, रणवीर कराड यांच्यासह संपुर्ण कराड कुटूंबिय, भावीक भक्त, रामेश्वर आणि परिसरातील महिला पुरुष, भाजपाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते