लातूर : मागच्या ५० वर्षात विकासाचा वारसा निष्कलंकपणे सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन निष्ठेचा वारसा मांजरा परिवाराने जपलेला आहे सत्ता असो की नसो कायम आम्ही आपल्या मदतीला धावून आलो आहोत धीरज देशमुख यांनी मागच्या पंचवार्षिक कार्यकाळात १५०० कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत यापेक्षा अधिक कामे येणाऱ्या काळात एक मॉडेल राज्यात आदर्श मतदार संघ घडवण्यासाठी आमदार धीरज देशमुख यांना पुन्हा मतदारांनी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले आहे ते लातूर येथील विष्णुदास मंगल कार्यालयात आयोजीत रेणापूर तालुक्यांतील कामखेडा जिल्हा परिषद सर्कल मधील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या आयोजीत संवाद बैठक बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा संचालक यशवंतराव पाटील, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जागृति शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, रेणाचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, रेणाचे संचालक लालासाहेब चव्हान, माणिक सोमवंशी, ॲड शहाजी हाके,जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके , नागनाथ कराड, शहाजी हाके, विश्वासराव देशमुख हरिराम कुलकर्णी, सतीश पाटील, अमर वाकडे आदि मान्यवर उपस्थित होते
राज्यात लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील लातूर शहर लातूर ग्रामीण या विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख यांच्या सोबत जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील विकास आघाडीच्या उमेदवारांना साथ द्या त्यांना निवडून द्यावे असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले
यावेळी संभाजी सुळ,अमर वाकडे प्रमोद कापसे, धनराज देशमुख, सचिन दाताळ, अशोक राठोड प्रदीप राठोड बाळकृष्ण माने, शुभम पडूळ कर, प्रकाश सूर्यवंशी, रामहरी गोरे हंसराज देशमुख, संग्राम माटेकर, रमेश सूर्यवंशी एकनाथ पाटील राजाभाऊ साळुंके, आशादुल्ला शेख, नागरगोजे यांच्यासह रेणाचे संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक कोंग्रेसचे बूथ प्रमुख विविध सेल चे प्रमुख उपस्थित होते

