24.1 C
New York
Monday, July 7, 2025

राज्यातील सरकार दिवाळखोरीत- माजी मंत्री दिलीपराव देशमुखमाजी मंत्री दिलीपराव देशमुख

लातूर : यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख निवडून तर येणारच आहेत पण किती मताधिक्य देणार ते मताधिक्य यापूर्वीचे रेकॉर्ड मोडणारे असावे अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली गावागावात विरोधक आहेत विरोधकांनाही आपल्या घरी चहा पिण्यासाठी बोलवा असा सल्लाही त्यांनी याप्रसंगी कार्यकर्त्यांना दिला शेतीमालाचे भाव दहा वर्षे वाढत नाहीत शेतकऱ्यांना स्वाभिमान योजना राबवली जाते प्रतिदिन 17 रुपये 33 पैसे हे सरकार देते आहे 17 रुपये 33 पैसे नको पण आमच्या सोयाबीनला भाव द्या. आफ्रिकेऊन येणारे सोयाबीन बंद करा आणि लातूरचे सोयाबीन खरेदी करा असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला सेवेच्या माध्यमातून बँक चालवली जाते पण ती दिवाळी खोरीत निघणार नाही याची आम्ही काळजी घेतो मांजरा परिवारातील सर्व साखर कारखाने एफआरपी आधिक भाव देवुन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम आम्ही केले पुढेही करणार असून यासाठी लातूर शहर मतदार संघातून अमित देशमुख तर लातूर ग्रामीण मतदार संघातून धीरज देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे त्यांना आशीर्वाद द्या असे आवाहन त्यांनी केले

गेल्या आडीच वर्षात राज्यात आलेले उद्योग सामंजस करार झालेले असताना महायुती सरकारने गुजरातकडे वळवले आहेत असा आरोप आमदार धीरज देशमुख यांनी करून या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नुसत्या घोषणा देवुन सर्व समाजाला फसवले आहे या उलट राज्यात अडीच वर्षापूर्वी सत्तेवर आलेले महाविकास आघाडी सरकारने कोविड काळात अतिशय चांगलं काम केलं लोकांना मोफत लस दिली जागतिक संघटनेने राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक केले असे सांगून आपत्कालीन परिस्थितीत मंत्री आमदार अमित राजेश टोपे, मंत्री आमदार अमितजी देशमुख साहेब यांनी राज्यातील लोकांना मदत केली दिवस रात्र फिरून लोकांना धीर दिला हे आपल्याला विसरता येणार नाही आताचे सरकारमधील लोक मात्र नुसत्या घोषणा देवुन वेळ मारून नेत आहेत याचाही आपण बारकाईने विचार करण्याची गरज आहे असे आमदार धीरज देशमुख यांनी सांगून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार निवडून येणार आहे आपल्या मतदार संघात गावाची गरज ओळखून सर्व गावांना विकास कामांसाठी निधी दिला असून यापुढेही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच आगामी निवडणुकीत काँग्रेस विजयी होईलच तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात आपला वाढपी पाहिजे यासाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातून काँग्रेस महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले

यावेळी व्यासपीठावर लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासरावजी देशमुख,राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, मदन भिसे, इंदिरा सूतगिरणीचे चेअरमन बाळासाहेब कदम, जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके, पृथ्वीराज शिरसाठ ,राजकुमार पाटील, अँड प्रवीण पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके,मांजरा साखर कारखान्याचे संचालक बाबुराव जाधव, बंकटराव कदम, रघुनाथ शिंदे संभाजीराव सुळ, पुंडलिक माने रणजित पाटील शाहुराव पवार ज्ञानेश्वर भिसे, रामदास पवार हरिराम कुलकर्णी शिवाजी कांबळे चांदपाशा इनामदार बालाजी पाटील धनंजय बावणे अभिमान भोले, अमोल भिसे संभाजी कदम, महेश अन्नदाते, मादळे, माणिक पुजारी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथ प्रमुख उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles