यशवंत विद्यालयाचे 100 टक्केचे 6 विद्यार्थी 90 टक्केच्या पुढे 136 विद्यार्थी
अहमदपूर : शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशवंत विद्यालयाच्या 6 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळालेले असून 90% पेक्षा जास्त घेणारी 136 मुलं आहेत.
त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार टागोर शिक्षण समितीचे सचिव शिक्षण महर्षी डी.बी.लोहारे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र पैके, सहसचिव डॉक्टर सुनिता चवळे, मुख्याध्यापक गजानन शिंदे, उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी डॉक्टर अशोक सांगवीकर, डॉक्टर भालचंद्र पैके, डॉक्टर सुनिता चवळे यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली .अध्यक्षीय समारोप डी.बी.लोहारे गुरुजी यांच्या भाषणाने झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांनी सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी तर आभार राजकुमार घोटे यांनी मांनले.
या सोहळ्याला गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी टागोर शिक्षण समितीचे सचिव डी बी लोहारे गुरुजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर अशोक सांगवीकर, डॉक्टर भालचंद्र पैके, डॉक्टर सुनीता चवळे, गजानन शिंदे, राजकुमार घोटे, राम तत्तापुरे यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती.