लातूर- जीवन विकास प्रतिष्ठान संचलित मूकबधिर उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १२ वीचा 91 टक्के निकाल लागला असून यात एकूण ३१ विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बारावीच्या परीक्षेमध्ये ३४ विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्यातून ३१ विद्यार्थी पास झाले आहेत. यात वसीम गवंडी या विद्यार्थ्याने 76.17% प्रथम , प्राची होगले 63.50% द्वितीय तर सोनम कांबळे 60.83% हिने तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक आमदार अमितभैया देशमुख साहेब, संस्थेचे अध्यक्ष जयसिंहराव देशमुख, अभय शहा, संजय निलेगावकर,डॉ. चेतन सारडा , ललितभाई शहा, पी व्ही कुलकर्णी तसेच सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संतोष देशमुख, प्राचार्य राजेश शर्मा तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी वृंदानी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.