23.4 C
New York
Monday, July 7, 2025

मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्याकडून वसतिगृहांची तपासणी

लातूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर यांच्यातंर्गत कार्यरत असलेल्या अनुदानित वसतिगृहांना अचानक भेटी देवून तपासणी केली.

तपासणी प्रसंगी वसतिगृह अधिक्षकांना विविध प्रकारच्या सूचना करण्यात आल्या. वसतिगृहात तक्रार पेटी ठेवणे, तक्रारींच्या नियमितपणे नोंदी ठेवणे व निरसन करणे, वसतिगृहात स्वच्छता ठेवणे, वसतिगृहात पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवण्याबाबत आणि वसतिगृह अभिलेखे अद्ययावत ठेवण्याबाबत वसतिगृह व्यवस्थापनास सूचना दिल्या. तसेच समाज कल्याण निरीक्षक, जिल्हा परिषद लातूर व संबंधित जवळच्या पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांचे मोबाईल नंबर दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही दिल्या. कोणतीही तक्रार असल्यास त्यांना संपर्क करण्याबाबतचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. तपासणीवेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, समाज कल्याण निरीक्षक अंकुश बिरादार यांची उपस्थिती होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles