लातूर : भारत सरकारने चालू केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा २०२४ या अभियाना अंतर्गत २ ऑक्टोबर रोजी ५३ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी, लातूर व महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, एन. सी. सी विभाग, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने नाना-नानी पार्कमध्ये स्वच्छता श्रमदान करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये प्रथम ५३ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी, लातूरचे कमांडिंग अधिकारी लेफ्टनंट कर्नल वाय. बी. सिंग व महात्मा बसेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी उपस्थित असलेल्या सर्व कॅडेट व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले व स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.
या कार्यक्रमांमध्ये एकूण 300 हून अधिक एन.सी.सी कॅडेट विविध महाविद्यालयाचे सहभागी झाले होते. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील एन. सी. सी.चे केअर टेकर डॉ. सुजित हांडीबाग यांनी ५३ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी., लातूरचे कमांडिंग अधिकारी यांच्या सूचनेनुसार सर्व कॅडेटकडून स्वच्छतेसाठीची पूर्वतयारी करून घेतली व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
या स्वच्छता श्रमदान कार्यक्रमांमध्ये ५३ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी, लातूर मधील सुभेदार मेजर शंभू सिंग, सुभेदार हुरेंद्रा सिंग, सुभेदार संजय चिखली, सुभेदार शेख पाशा, सुभेदार उत्तम पाटील, नायब सुभेदार बाजीराव पाटील, नायक सुभेदार देवेंद्र सिंग व इतर पीआय स्टाफ, देशी केंद्र माध्यमिक विद्यालयचे ए. एन. ओ. सचिन गिरवलकर, व्यकटेश माध्यमिक विद्यालयचे ए. एन. ओ. राजेश देवकर यांनी सहभाग नोंदवला होता.
तसेच लातूर महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांनीही या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली होती.
स्वच्छता श्रमदान या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व पदाधिकारी व एन. सी.सी. कॅडेट यांनी सकाळी नऊ ते अकरा असे एकूण दोन तास नाना नानी पार्क मध्ये श्रमदान करून संपूर्ण नाना नानी पार्कची स्वच्छता केली व गोळा केलेला कचरा महानगरपालिकेच्या वाहनांनी उचलण्यात आला.
या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कॅडेट व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित स्वच्छतेची शपथ घेतली व राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
