लातूर, शहर प्रतिनिधी : येत्या २०२६ मध्ये होणाऱ्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार गट पूर्ण ताकदीने लढणार असल्याची पक्षाचे मराठवाडा समन्वयक विश्वजीत चव्हाण यांनी बुधवारी लातुरात केली. या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाकडून मतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आले असून, लातूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या नोंदणी मोहिमेत जोमाने सहभाग घ्यावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. या बैठकीत विश्वजीत चव्हाण यांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय शेटे माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आ.सुधाकर भालेराव, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, प्रदेश उपाध्यक्ष ॲड.संभाजीराव पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजी मुळे, शहराध्यक्ष राजा मणियार,सोमेश्वर कदम, मल्लिकार्जुन करडखेळकर, संतोष शिंदे, इंजि. विनायक बगदुरे, मदन काळे, रघुनाथ कुचेकर, लातूर तालुकाध्यक्ष बकतावर बागवान, प्रा प्रशांत घार प्रा.माधव गंगापुरे परमेश्वर पवार, यशवंत भोसले, बालाजी कदम, लक्ष्मीकांत तवले, निशांत वाघमारे, रघुवीर पाटील, युवराज वीर, पप्पू कासले, सन्नऊला शेख, राजाभाऊ माने, ॲड.आशिष चव्हाण, चंद्रशेखर कत्ते, कल्पना फरकांडे, सुरेश पाटील, चंद्रकांत पाटील,समाधान गिरी,रामभाऊ बेल्लाळे,अण्णासाहेब पाटील, गजानन साताळकर, शामराव पाटील, अमरनाथ मुर्के, सय्यद सैदोदिन, विजय राजमाने,प्रमोद पाटील, नारायण नागरगोजे, प्रवीण साळुंखे,शादाब शेख, व्यंकट हंद्राळे, पाशा फरीद, प्रेमचंद पवार,मारुती गायकवाड,नेमचंद पाटील, यशवंत पवार, बाळासाहेब धुपे पाटील, हमीद शेख, सतीश बिरादार,सय्यद अली,बापू पवार,धनाजी कोयले,सारंगे संतोष, सूर्यवंशी दिपक, पांडुरंग बेंबडे, सुरेश रोळे, तुकाराम शिवलकर, पुरुषोत्तम पाटील, डी. उमाकांत, सतीश शेलार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



