लातूर : लातूर शहर महानगर पालिकेच्या आस्थापनेवरील विविध संवर्गात कार्यरत असणाऱ्या एकूण ३२ कर्मचाऱ्यांना अंतर्गत पदोन्नती देण्यात आली. मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या हस्ते त्यांना पदोन्नतीचे आदेश प्रदान करण्यात आले.
मनपामध्ये कार्यरत असणारे प्रदीप जोगदंड,संतोष लाडलापुरे, प्रविण कांबळे,बालाजी शिंदे, रंदावनी पवार,व छाया आखाडे , यांना वरिष्ठ लिपिक संवर्गात पदोन्नती देण्यात आली. वर्ग ४ च्या संवर्गामध्ये कार्यरत ज्ञानदेव पर्वते यांना स्वच्छता निरीक्षक पदावर तसेच वर्ग ४ संवर्गातील किरण कांबळे व अंकुश ताकपिरे यांना लिपिक टंकलेखक या पदावर पदोन्नती देण्यात आली.तसेच मनपातील २३ कर्मचाऱ्यांना सफाई कामगार संवर्गातून मुकादम या पदावर पदोन्नतीचे आदेश देण्यात आले.
या सर्व कर्मचाऱ्यांना आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या हस्ते पदोन्नतीचे आदेश प्रदान करण्यात आले.यावेळी अतिरिक्त आयुक्त शुभम क्यातमवार,उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे, मुख्य लेखापरीक्षक तथा उपायुक्त (सा.प्र.) श्रीमती कांचन तावडे,मुख्य लेखाधिकारी रावसाहेब कोलगणे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पदोन्नती झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे आयुक्त व अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
