लातूर : २०२३- २४ या शैक्षणिक वर्षात झालेल्या शालांत परीक्षेत मनपाच्या पीएमश्री सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक ९ चा निकाल १०० टक्के लागला आहे. या यशाबद्दल मनपा आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
या शाळेतील विनायक विजयकुमार जाधव हा ८९.२० टक्के गुण घेऊन प्रथम, रोहित मंगलसिंग खिक्ची ८०.६० टक्के गुण घेऊन दुसरा क्रमांक पटकावला. वैभव शामराव फुलारी यास ७९ टक्के, पायल महादेव क्षीरसागर हिला ७८.२० टक्के, रूपाली पांडुरंग परांडे या विद्यार्थीनीस ७५.८० टक्के, पुजा दामा हिला ७५.२० टक्के गुण मिळाले.परीक्षेला बसलेले शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या यशाबद्दल मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे,अतिरिक्त आयुक्त शुभम क्यातमवार, उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे-पाटील शिक्षणाधिकारी साहेबराव जाधव यांनी उत्तीर्ण विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.