तळेगाव (भो.)येथे जयभवानी मंडळ यांच्या वतीने नवरात्रमहोत्सवानिमित्त व ग्रामदैवत भोगेश्वर महादेव मंदीर येथे सहकारमहर्षी तथा राज्याचे माजी माजी मंत्री मा.दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते येथे महाआरती व निलंगा मतदारसंघाचे कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख नेते तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी जागृतीचे व्हा.चेअरमन लक्ष्मण मोरे,मा.आमदार त्र्यंबकनाना भिसे,प्रदेश सचिव अभय साळुंके,डिसीसीचे व्हा.चेअरमन प्रमोद आबा जाधव,डॉ.सेलचे अध्यक्ष डॉ.अरविंद भातम्बरे,डिसीसीचे संचालक दिलीप पाटील नागराळकर,महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सौ.शिलाताई पाटील,कृ.उ.बा.स.माजी सभापती गोविंदराव भोपणीकर,रेणाचे संचालक संभाजी रेड्डी,सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष हरिराम कुलकर्णी,देवणी तालुकाध्यक्ष अजित बेळकूने,जिल्हा कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष मलबा घोणसे,प्रा.भगवान गायकवाड,तसेच समस्त गावकरी मंडळ,महिला वर्ग व जय भवानी मित्र मंडळाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
