23.9 C
New York
Monday, July 7, 2025

भीमसैनिक व आंबेडकरी बांधवांचे लातूर येथे थाळीनाद आंदोलन

लातूर : महात्मा फुले मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मुंबई, यांच्याकडे अर्जदारांनी सन २०२३-२०२४ या वर्षी दाखल केलेले एनएसएफडिसी योजने अंतर्गत दाखल केलेल्या कर्जाकरीता महाराष्ट्र शासनाच्या हमीपत्रा अभावी अर्जदारांचे कर्ज मंजुर होत नसल्याने भीम सैनिक व आंबेडकरी बांधवानी आज गांधी चौक लातूर येथे थाळीनाद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य सरकारकडून अनुसुचित जातीतील अनेक गोरगरीब लोकांना व्यवसायासाठी महात्मा फुले मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मुंबई यांच्याकडे सन २०२३-२०२४ या वर्षी दाखल केलेले एनएसएफडिसी योजनेअंतर्गत अनेक अर्जदारांनी अर्ज दाखल केलेले आहेत.परंतु सदर कर्जाकरीता महाराष्ट्र शासनाच्या हमीपत्र न  दिल्याने सदर कर्ज मंजुर होत नाहीत. कर्जाच्या फाईलींकरीता शासनाचे हमीपत्र तात्काळ देऊन सदर कर्ज फाईली  मंजुर करण्याच्या सुचना संबंधित विभागास देण्यात याव्यात अशा विषयाचे निवेदन भीमसैनिक व आंबेडकरी बांधवानी आज गांधी चौक लातूर येथे थाळीनाद आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री,अर्थमंत्री , उपमुख्यमंत्री,महात्मा फुले मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक यांना देण्यात आले.

यावेळी लाला सुरवसे, माजी नगरसेवक नवनाथ आल्टे, माजी नगरसेवक राहुल कांबळे, डी.उमाकांत, समाधान शितोळे, विष्णू तांदळे, निलेश मांदळे, विनोद माने, विनय जाकते, रवी गायकवाड, श्रृंगारे अमोल, कैलास कांबळे, सुरज सुरवसे, दिपक सिरसाठ, महेश जाधव, पांडुरंग आदमाने,मुरली गायकवाड,विलास चक्रे,परमेश्वर चव्हाण, राहुल सरवदे, प्रफुल्ल किर्ते, सचिन कांबळे, महेंद्र कांबळे,साहेबराव गायकवाड, लखन धावारे उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles