बाल संरक्षण प्रक्रियेत लातूर जिल्हा माॅडेल करु-पोलीस अधिक्षक सोमय मुंडे

0
173

लातूर –पोलिस अधिक्षक कार्यालय आणि कलापंढरी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी व अमलदार यांच्यासाठी पोक्सो कायदा क्षमता बांधणी या विषयावर एक दिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदरची कार्यशाळा पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे पार पडली.

कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य बाल संरक्षण आयोगाचे सदस्य संजय सेंगर, हे उपस्थितीत होते.
बाल संरक्षण यंत्रणा व बालकांवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या समन्वयातून बालकांच्या संरक्षण प्रक्रियेत लातूर जिल्हा मॉडेल बनवू त्यासाठी लातूर पोलीस 24 तास मदत करण्यास तत्पर आहे असे मनोगत श्री सोमय मुंडे यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना अजय देवरे अपर पोलीस अधीक्षक लातूर यांनी बालकांसंदर्भात घडलेल्या गुन्ह्यांच्या तपासात पोलीस यंत्रणेस येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय याबाबत उपस्थित यांना मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर बालकल्याण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण देशमुख, बाल न्याय मंडळाच्या सदस्या छायाताई मलवाडे, परिविक्षाधीन पोलिस उप अधिक्षक, राजेश्री पाटील, कलापंढरीचे अध्यक्ष बी.पी. सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
या नंतर राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य संजय सेंगर यांनी पोक्सो कायदा 2012 या कायद्याची सविस्तर माहिती सांगून या मध्ये नविन झालेले बद्दल या कायद्या अंतर्गत बालकांची आलेली केस पोलीसांनी कशी हाताळावी या मध्ये पोलीसांची भुमिका काय, बाल न्याय मंडळाची भुमिका काय तसेच बालकल्याण समितीने कोणती आणि कशी भुमिका व जबाबदारी पार पाडावी, कोणत्या कलमा अंतर्गत एफ.आय.आर. दाखल करावा. तसेच अंतीम अहवाल कसा आणि किती दिवसात दाखल करावा, पोक्सो केस मधील कागदपत्रे कशी जमा करावीत आदी संदर्भात सविस्तर माहीती दिली. कार्यशाळेचे सुत्रसंचलन सविता कुलकर्णी यांनी केले. यशस्वीतेसाठी कला पंढरी संस्थेच्या टिमने व पोलिस भरोसा सेल यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here