शिक्षकांनी सेवानिवृत्तीच्या काळात सामाजिक कामात अग्रेसर रहावे –शिक्षण महर्षी डी.बी. लोहारे गुरुजी अहमदपूर – भारतीय संस्कृतीमध्ये गेल्या अनेक पिढ्यापासून समाजामध्ये शिक्षकांना अत्यंत मानसन्मान दिला जातो त्यामुळे शिक्षकांनी सेवानिवृत्तीचा काळ सामाजिक कार्यात झोकून देऊन कार्य करावे असे आग्रही प्रतिपादन टागोर शिक्षण समितीचे सचिव शिक्षण महर्षी डी.बी.लोहारे गुरुजी यांनी केले. ते यशवंत विद्यालयाचे लिपिक बालाजी माळी यांच्या 26 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांना शाळेच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व भर आहेर देऊन सेवा गौरव कृती सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरन बोलत होते . यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून शांतिनिकेतन पतसंस्थेच्या माजी चेअरमन पुष्पाताई लोहारे, संस्थेच्या सहसचिव डॉ. सुनिता ताई चवळे, प्राचार्य गजानन शिंदे, सत्कारमूर्ती बालाजी माळी, सौ अश्विनी माळी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी सेवानिवृत्तबद्दल शाळेच्या वतीने बालाजी माळी, आश्विनी माळी यांचा शाल, श्रीफळ आणि भर आहेर देऊन शिक्षण महर्षी डी. बी. लोहारे गुरुजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी यावेळी प्रा.दासराव कोरे ,गहीनीनाथ क्षिरसागर, डॉक्टर सुनिता ताई चवळे, सत्कारमूर्ती यांचे मनोगत पर भाषण झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांनी सूत्रसंचालन कपिल बिराजदार यांनी तर आभार राजकुमार पाटील यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत विद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.