लातूर : श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे यांचा सहपरिवार स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि आहेर देऊन अध्यक्ष आदिनाथ सांगवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे हे होते. तर विचारमंचावर संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर, सहसचिव सुनील मिटकरी, कार्यकारी संचालक प्रदीप दिंडेगावे, संचालक बाबुराव तरगुडे, संचालक राजेश्वर बुके, सुप्रसिद्ध इतिहास तज्ञ तथा विचारवंत प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, माजी जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे गुरुजी, प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, सत्कारमूर्ती प्रा. शिवशरण हावळे आणि सौ. अश्विनी हावळे यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य प्रा. संजय गवई, प्रा. रूपाली हलवाई, प्रा. रविंद्र सोनोने, प्रा. वनिता पाटील, प्रा. डी. डी. सूर्यवंशी यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी महात्मा बसवेश्वर एम्पलोयी को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे त्यांना धनादेश संस्था संस्थेच्या पदाधिकाऱ्यामार्फत देण्यात आला
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सेवा गौरव समारंभासंबंधी प्रा. शिवशरण हावळे यांना दिलेल्या शुभेच्छांचा गौरवांक सर्वांना वितरित करण्यात आला
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सेवानिवृत्त माजी प्राध्यापक डॉ. एन. बी. रेड्डी, डॉ. बी. एस. पळसकर, माजी उपप्राचार्य प्रा. रामदास मिरजगावे, प्रा. ओमप्रकाश साकोळकर, डॉ. बाळासाहेब गोडबोले, प्रा. गोविंद घार, प्रा. तुळशीराम बीचकाटे, प्रा. विजयकुमार धायगुडे, डॉ. श्रद्धा अवस्थी, डॉ. उमा कडगे तर महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टाफ सचिव प्रा. रवींद्र सुरवसे तर सूत्रसंचालन डॉ. घनश्याम ताडेवार आणि आभार प्रा. किसनाथ कुडके यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. गुणवंत बिरादार, नामदेव बेंदरगे, बालाजी डावकरे, आनंद खोपे, रमेश राठोड, राजाभाऊ बोडके, सय्यद जलील, संगमेश्वर मुळे यांनी परिश्रम घेतले.
