लातूर : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय,लातूर येथिल भूगोल विषयाचे प्रा.डाॅ.राजाराम दावणकर यांना महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद,महाराष्ट्र यांच्या वतीने कुसुम सभागृह नांदेड येथे माजी सहकारमंत्री मा.जयप्रकाश दांडेगावकर,महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा.गिरीशभाऊ जाधव व तसेच महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मा.व्यंकटराव जाधव यांच्या हास्ते महात्मा ज्योतीराव फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार रविवार दिनांक 08/09/2024 रोजी प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव प्राचार्य अंगदरावजी तांदळे साहेब,महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.बालाजी कांबळे,महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाअध्यक्ष श्री.लक्ष्मणराव दावणकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले
