अहमदपूर – मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत देवणी तालुक्यातील धनेगावचे महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सर्वप्रथम राहिले आहे.
त्यामुळे प्राचार्य रामलिंग मुळे यांनी यशवंत विद्यालयास भेट दिली असता त्यांचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापक गजानन शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उप मुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी सह मान्यवर शिक्षक दिसत आहेत.
