सततच्या मागणीला ; पालकमंत्र्यांमुळे यश
लातूर : प्रभाग 11 मधील,एक नंबर चौक ते सुभेदार रामजी नगर कमान इथपर्यंतच्या रस्त्याचा प्रश्न पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामुळे मार्गी लागला असून आज शुक्रवारी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन प्रभागातील जेष्ठ शिवाजी नरहरे,माजी नगरसेवक कुलदीपसिंह ठाकूर, नगरसेवक विशाल जाधव,आबा चौगुले, काका चौगुले,रंगनाथ बंडगर, श्री खंडागळे, श्री हैबतपुरे यांच्या शुभ हस्ते व प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या कामात पालकमंत्री यांचे विशेष सहाय्य मिळाले असल्याने बहुप्रलंबित असा हा प्रश्न मार्गी लागल्याने यावेळी नागरिकांनी आनंद व्यक्त केला.लातूरचे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्याच लातूर भेटीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भेटून मी स्वतः हा प्रश्न लेखी मांडला असता तात्काळ पालकमंत्री यांनी प्रक्रिया सुरू केली होती, व 22 एप्रिल रोजी मुंबई येथे मी भेट घेऊन परिस्थिती सांगितली असता तात्काळ पालकमंत्री यांनी हे काम सुरू करावे असे आदेश प्रशासनाला दिले होते व आज प्रत्यक्षात काम सुरू झालं असल्याने प्रभाग 11 चा अनेक वर्षाचा विषय पालकमंत्री यांच्यामुळे मार्गी लागला असल्याने पालकमंत्री यांचे जाहीर आभार.या सोहळा प्रसंगी राजाभाऊ मंदाडे, हरिकिशन गोमारे, उमेश बारकुले, सदाशिव आबा चौगुले, हरके अप्पा, काका चौगुले,निर्भय कोरे,श्री.स्वामी, किरण पायाळ,शहाजी कांबळे,सचिन कांबळे,सागर फत्तेपुरे,राजेश कपाळे, आकाश भिसे,विजय गोमारे,श्री.बानाटे, श्री.सावंत, श्री.कुलकर्णी,विश्वास कांबळे,सौ.रंजना गोमारे, सौ.वनिता हारके,सौ.तोडकर,सौ.इंदुमती वाघमोडे, सौ.काशीबाई हांडे,सौ राठोड, प्रा.डॉ. सौ.प्रभा वाडकर,ज्येष्ठ पत्रकार विलास घारगावकर,हातिम भाई यांच्या सह श्रीनगर,अग्रोयानगर,सच्चिदानंद नगर, सुभाष नगर आदी परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
