25.5 C
New York
Monday, July 7, 2025

पुण्याला सर्वसाधारण तर संभाजीनगरला उपविजेतेपद व रत्नागिरीला तिसरा क्रमांक

34 वी राज्यस्तर वरिष्ठ गट महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धा

लातूर  : जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे आमदार अमित देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या 34 वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट महिला व पुरुष तायक्वांदो क्रीडा स्पर्धात पुणे जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले तर उपविजेतेपद संभाजीनगर व तृतीय क्रमांक रत्नागिरी यांना प्राप्त झाला आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते पार पडले तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा अधिकारी दत्ता गडपल्लेवार तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव तथा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई चे महासचिव मिलिंद पठारे राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बारगजे, कोषाध्यक्ष व्यंकटेश कर्रा, दोन वेळा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, राज्य पदाधिकारी धुलीचंद मेश्राम, अजित घारगे, सतीश केमसकर, राजेश महाजन, विजय कांबळे यांची उपस्थिती होती.

अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या स्पर्धेत राज्यातील 28 जिल्ह्यातून 400 हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. पुमसे क्रीडा प्रकारात सर्वसाधारण विजेतेपद मुंबई उपनगर तर उपविजेतेपद रायगड व तृतीय क्रमांक पालघर यांना प्राप्त झाले आहे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई यांच्या मान्यतेने लातूर जिल्हा तायक्वांदो संघटनेने 34 वी राज्यस्तर वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन लातूरातील जिल्हा क्रीडा संकुलात दिनांक 28 ते 30 सप्टेंबर यादरम्यान केली होती. या स्पर्धेमध्ये विविध राष्ट्रीय स्तरावरील विजेते खेळाडू सहभागी झाले होते. जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत तीन दिवस मोठा उत्साह जोश आणि जल्लोष पाहायला मिळत होता. 16 वजनी गटातील महिला व पुरुष खेळाडूंचा दिनांक 17 ते 20 ऑक्टोबर दरम्यान पांडेचेरी येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात आलेला आहे. क्युरोगी व पुमसे या दोन क्रीडा प्रकारात खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभागी होणार आहेत.

तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर जिल्हा संघटनेने कमी कालावधीत या राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन केले होते तर या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेचे सचिव नेताजी जाधव यांच्या मार्गदर्शनात एस व्ही कुलकर्णी, धनश्री मदने, श्रद्धा कुलकर्णी, जानवी मदने, आसावरी कुलकर्णी, अनुश्री कुलकर्णी, विवांशी अंदुरे, स्वराली देशपांडे, सृष्टी कांबळे, अशितोष कांबळे, श्रावणी खडबडे, गणेश खडबडे, अब्राहम सय्यद, श्रावणी मोरे, श्रद्धा मोरे, श्रीराम मोरे, मानवी भोपी, हर्षवर्धन काळे, प्रथमेश सूर्यवंशी, प्रगती सुर्यवंशी, यशश्री खुजे, नम्रता, विराज देशमुख, मानसी सूर्यवंशी पूजा जाधव, समर्थ जाधव, तपस्वी परिहार, वाल्मीक भिसे, बबन सुळे, आकाश मिरगे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles