30 C
New York
Tuesday, July 8, 2025

परीट समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे विविध मागण्याचे निवेदन.

लातूर : निलंगा तालुक्यातील परीट समाजाच्या वतीने व समाजाच्या पदाधिकारी यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे विविध मागण्याचे निवेदन जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्यामार्फत दिले आहेत.  गोपाळकृष्ण सेवा प्रतिष्ठान लातूर यांच्या वतीने गोशाळा उभारणी करता आर्थिक सहाय्य मिळवून द्यावे याबाबतचे निवेदन गोपाळ कृष्ण सेवा प्रतिष्ठानचे सचिव मोहनराव पोतदार व त्यांच्या सहकार्याने दिले. यामध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांचे टपाल तिकीट प्रकाशित करणे, संत गाडगेबाबा यांची शासन स्तरावर शासकीय जयंती साठी शासकीय आदेश देणे व सुट्टी जाहीर करणे, महाराष्ट्राचे विधान भवन येथे गाडगे महाराजांचे स्मारक उभे करावे, संत गाडगेबाबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा, मुंबई ते अमरावती एक्सप्रेस रेल्वे संत गाडगे महाराज यांच्या नावाने सुरू करावी, लॉन्ड्री व्यवसायिकासाठी 50% सवलतीत वीज पुरवठा करण्यात यावा, समाजातील पहिली ते पदवी तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रह सुरू करावेत,  महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात परीट समाजाच्या मुला मुली करिता स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करावे, हा समाज भूमीहीन असल्यामुळे समाजातील अपंग विधवा अनाथ मुले व वृद्ध यांना मासिक पेन्शन मंजूर करावी या समाजातील गोरगरीब मुला-मुलीचे लग्न सोहळे उत्सव जयंती पुण्यतिथी शैक्षणिक उपक्रम सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर सामाजिक सांस्कृतिय सभागृह नाट्यमंदिर निर्माण करून द्यावे या व अनेक मागण्याचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्याकडे त्यांच्या निवासस्थानी देण्यात आले.यावेळी रमेश मारुतीराव जगताप, बालाजी दगडू दळवे ,माधव दळवे, पांडुरंग विहिरे ,दयानंद शिंदे, मनोज आलोरे, दत्ता दळवे ,महेंद्र काळे ,प्रसाद उजवे, बालाजी उजवे हरिभाऊ शिंदे पांडुरंग जगताप ,अंकुश सूर्यवंशी व तसेच इतर बरेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles