23.4 C
New York
Monday, July 7, 2025

नेत्रदान रॅली व बक्षीस वितरण कार्यक्रम

लातूर : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझन, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय व राजस्थानी महिला मंडळ, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदान रॅली व बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
या रॅलीला कै. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅली मार्गस्थ करण्यात आली. यावेळी जिल्हा नेत्र चिकित्सक डॉ श्रीधर पाठक, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ विजय भाऊ राठी, डॉ. गोपीकिशन भराडीया, सरिता सारडा, पुखराज दर्डा, आशिष बाहेती, चंद्रकला भार्गव, वसुंधरा गुडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, समन्वयक डॉ. नल्ला भास्कररेड्डी, एनसीसी केअर टेकर डॉ सुजित हंडीबाग, डॉ. गुणवंत बिरादार, माजी उपप्राचार्य बी. एस. पनुरे, रोटरीचे अध्यक्ष महादेव पांडे, प्रा. व्यंकट दुडीले, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे आदींची उपस्थिती होती.
ही रॅली महात्मा बसवेश्वर महाविद्यालय ते गांधी चौक, गंजगोलाई मार्गे पुन्हा महात्मा बसवेश्वर महाविद्यालय एम. सी. व्ही. सी. सभागृह या ठिकाणी आली. या रॅलीमध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर, दयानंद कला महाविद्यालय लातूर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चित्रकला महाविद्यालय येथील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर या रॅलीचे बक्षीस वितरण समारंभात रूपांतर झाले. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, रोटरी क्लब ऑफ लातूर, राजस्थानी महिला मंडळ लातूर चित्रकला महाविद्यालय लातूरच्या वतीने घेण्यात आलेल्या नेत्रदान चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने झाली.
या निमित्ताने आदिनाथ सांगवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच डॉ श्रीधर पाठक यांनी नेत्र व नेत्रचिकित्सा या संदर्भात मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ विजय भाऊ राठी यांनी 2025 वर्षात 80 ते 100 नेत्र रुग्णांना नेत्रदान व नेत्रचिकित्सा करण्याचा संकल्प बोलून दाखवला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. विजय भाऊ राठी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, संस्थेचे जेष्ठ संचालक राजेश्वर बुके, जिल्हा नेत्रचिकित्सक डॉ. श्रीधर पाठक, पुखराज दर्डा, राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा आरती सारडा, डॉ गोपीकिशन भराडीया, प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, माजी उपप्राचार्य डी. एस. पनुरे, डॉ. गुणवंत बिरादार, महादेव पांडे, प्रा निळकंठ स्वामी, कार्यालयीन प्रमुख नामदेव बेंदरगे इत्यादींची उपस्थिती होती.
या बक्षीस वितरण समारंभात गुणानुक्रमे उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून बेंडके आरती राजेश्वर व कदम सौंदर्या राजेंद्र यांना देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे पारितोषक कु पाटील मनस्वी संदीप, द्वितीय पारितोषिक भिकाने प्रांजली गणेश तर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक बिडवे अंकिता प्रभुलिंग यांना देण्यात आले.
सदरील कार्यक्रमात डॉ. गुणवंत बिरादार, प्रा .महादेव पांडे, प्रा. निळकंठ स्वामी, प्रा. रत्नपारखी मॅडम, प्रा. कुलकर्णी मॅडम, रोटरी क्लब, राजस्थानी महिला मंडळ, रोटरी क्लब ऑफ लातूर, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, क्रीडा विभाग, व्यवसाय अभ्यासक्रम विभाग, समाजकार्य विभाग व वाणिज्य शाखा विभाग या सर्वांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी केले तर सूत्रसंचालन रासेयो कार्याक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे, प्रा. किसनाथ कुडके यांनी केले तर आभार माजी उपप्राचार्य बी. एस. पनुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तथा नंदकुमार काजापुरे, बालाजी डावकरे, संदीप मोरे, संगमेश्वर मुळे, कृष्णा कोळी आदींनी परिश्रम घेतले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles