भिमराव कांबळे, अहमदपूर : निलंग्याहून नांदेड ला जाणारी एस टी बस रात्री साधारतः ०८ : ०० वाजता अहमदपूर शहरातील वैभव लॉज जवळ दुभाजकावर जाऊन आदळल्याने बसमधील १७ प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ४० प्रवाशी घेऊन निघालेली एस.टी. बस क्र – MH – 20 BL – 2890 निलंगा – नांदेड ही बस अहमदपूर शहरात प्रवेश करताच समोरून मोटारसायकल स्वार विरुद्ध दिशेने आल्याने अपघात टाळण्यासाठी बसच्या चालकाने प्रसंगावधान राखून उजव्या बाजुला बस वळवली असता रस्त्याच्या मधोमध असलेल्या रस्ता दुभाजकावर चढली व दुभाजकावरील विद्युत पोलला जाऊन धडकली असे बसचालकाडून सांगण्यात आले. या अपघातात मोटारसायकलस्वार वाचला मात्र बसमधील 17 प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे दिसून आले. बसमधील प्रवाशांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे दाखल करून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चिवडे यांनी उपचार केले. यात गंभीर दुखापत कुणालाही झाली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमी प्रवाशांमध्ये दत्ता व्यंकटराव पौळ 2. शरपोददीन रसुलसाब शेख 3. मोहन नामदेव सुर्यवंशी 4. गोविंद शिवराम अलगुले 5. सरिता गोविंद अलगुले 6. सुशिला गोविंदराव कदम 7. सागर लिंबाजीराव कदम 8. राजाबाई भास्कर कदम 9. पार्वती सुरेश कदम 10. लताबाई सर्जेराव मोरे 11. अन्नपूर्णा प्रल्हाद कदम 12. मंगलं नागोराव पावडे 13. गोपाळ दत्तू गोरगे 14. सुलोचना पंडीतराव कदम 15. पार्वती शंकर कदम 16. मोहन नामदेव सुर्यवंशी 17. शशिकला शिवाजीराव कदम यांचा समावेश आहे. शहरातील बेशिस्त पार्किंग व वाहन चालकामुळे अहमदपूर शहरात अनेकदा असे छोटे मोठे अपघात होत असून पोलीस प्रशासनाने याबाबत योग्य कारवाई करून अशा प्रकारे होणाऱ्या अपघातास आळा घालावा अशी नागरीकातून मागणी करण्यात येत आहे.

