लातूर :- लातूर शहर पूर्व भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक नांदेड रोडवर गेली अनेक वर्षांपासून पावसाचे पाण्याचा डोह साचत असल्याने सदरील समस्याकडे लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी लातूर शहर पूर्व भाग नागरी हक्क कृती समितीच्या वतीने मागील काळात लोकशाही मार्गाने अनेक वेळा निवेदन देऊन कांहीं काम होत नसल्याने रोडवर साचलेल्या पाण्यात कागदी होड्या, पाण्यात मांडी घालून बसणे, साचलेल्या पाण्यात बेशर्माचे झाड लावण्याचे आंदोलन करूनही काम होत नसल्याने सदरील रोडवर साचलेल्या पाण्यात आयुक्त मनोहरे यांचा फ़ोटो लावलेली जहांज सोडून तीव्र निषेध आंदोलन केल्यानंतर प्रसिद्धीस आलेल्या बातम्यांची दखल घेऊन आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पाणी निचऱ्याकरीता तात्काळ कारवाईचे आदेश दिले असता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक नांदेड रोडवरील पाणी निचऱ्याकरता ड्रेनेज भूमिगत पाईपलाईन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते स्वामी विवेकानंद चौक ड्रेनेज पाईपलाईन, रोड हॉट मिक्सिंग डांबरी रस्ता करून दुतर्फा गट्टू फुटपाथ बसवण्याचे विकास कामे करण्यात आले. पण काल पडलेल्या पाहिल्याच पावसात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक नांदेड रोडवर पूर्वीप्रमाणे पाणी साचाल्याने सदरील काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे प्रथम दर्शनी पाहणीतून दिसून येत असल्याने आज पर्यंत केलेल्या विकास कामाचा पैसा वायफट गेल्याचे असल्याने संबंधित केलेल्या कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची लातूर शहर पूर्व भाग नागरी हक्क कृती समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे, बाबासाहेब बनसोडे, सुरेश संगापुडे, नितीन चालक, तायप्पा कांबळे, मुन्ना हाश्मी इत्यादींनी प्रसिद्धी माध्यमातून मागणी केली आहे.
