जोरदार घोषणाबाजी करत शाळा प्रशासण व शिक्षण विभागाचा केला निषेध
लातूर : 3 एप्रिल रोजी लातूर मधील शिक्षण विभागाची कसल्याही प्रकारची मान्यता नसलेली नारायणा इ टेक्नो स्कूल या शाळेस मनसे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे व मनविसे जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात शाळेस कुलूप ठोकून जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आले
यावेळी मनसेच्या वतीने दोन वर्षांपासून शाळा सुरु आतानाही शिक्षण विभागाचा अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे शिक्षण प्रशाशनाचा व शाळा प्रशाशनाचा मनसे च्या वतीने निषेध करण्यात आला शिक्षण विभागाने सदरील संस्थे
स 10 जानेवारी 2025 ला शाळा बंद करावी व ज्या विधार्थ्यांचे प्रवेश या शाळेने घेतले आहेत ते जवळच्या शाळेत स्थलातंरित करावे. तसेच शाळेणे नवीन प्रवेश घेऊ नयेत तसेच शाळेला RTE नियमाचे उल्लंघन केल्यामुळे 1990000 रुपयाचा दंड लावला आहे तो दंडही त्यांनी भरला नाही तसेच शिक्षण विभागाने शाळा बंद करावे असे शाळेत बँनर लावले असता शाळा प्रशासनाने ते बॅनरही काढून टाकले त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नारायणा ई टेक्नो स्कूल ही बोगस शाळा तात्काळ बंद करावी यासाठी 25 मार्च रोजी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी लातूर व शाळा प्रशासनास निवेदन देण्यात आले होते. परंतु शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळेतील विधार्थ्याचे प्रवेश दुसऱ्या शाळेत ट्रान्सफर करणे तर दूरच याउलट नवीन विधार्थी प्रवेश घेवून पालकांकडून फिसच्या स्वरूपात सत्तर-सत्तर हजार रुपये उकळण्याचे काम शाळेकडून सुरु होते. त्यामुळेच आज विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व पालकाची फसवणूक होऊ नये यासाठी शाळेच्या गेटला कुलूप लावून निर्दर्शने आंदोलन मनसेच्या वतीने करण्यात आले. जर शिक्षण विभागाचा आदेश डावलून व मनसेने केलेल्या आंदोलनाला न जुमानता शाळा प्रशासनाने शाळा सुरुच ठेवली तर मनसेच्या वतीने शाळा संचालकाच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा यावेळी देण्यात आल
ा
यावेळी भागवत शिंदे, अंकुश शिंदे, सचिन शिरसाठ, अनिल पांढरे, बजरंग ठाकूर, योगेश सूर्यवंशी, ध्रुव महापुरकर, श्रीनाथ धुर्वे, रवी पांचाळ, केशव लातूरकर, महादेव महाडक, बालाजी गायकवाड, आकाश जोगदंड, सिद्धेश्वर रीद्देवाड, मनोज माने, ज्ञानेश्वर शेटे, बलभीम वजीरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते
