लातूर : श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचालित महात्मा बसेश्वर महाविद्यालयातील क्रीडा संचालक डॉ. नल्ला भास्कर रेड्डी यांची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयकपदी व प्रा. वनिता पाटील यांची कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि लेखणी देवून सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य प्रा. संजय पवार, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, समाजकार्य शाखा समन्वयक डॉ. दिनेश मौने, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ विजयकुमार सोनी, विज्ञान शाखा समन्वयक डॉ. सिद्राम डोंगरगे, मराठी विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे, तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. शीतल येरूळे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. यशवंत वळवी, दुग्धशास्त्र विभागप्रमुख डॉ. गुणवंत बिरादार, प्रा. नितीन वाणी, डॉ. अश्विनी रोडे आणि रत्नेश्वर स्वामी आदींची उपस्थिती होती.
डॉ. नल्ला भास्कर रेड्डी हे महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागाचे संचालक असून ते राष्ट्रीय पातळीवरचे बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पंच, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक म्हणून सहभाग नोंदविला आहे. त्याच सोबतच अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्र, कार्यशाळा, परिसंवाद यात त्यांनी शोध निबंध वाचक, बीजभाषक, साधन व्यक्ती म्हणूनही सहभाग नोंदविला आहे. ते पीएचडीचे तज्ज्ञ मार्गदर्शक असून महाविद्यालयीन, विद्यापीठीय अनेक समित्यांमध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
प्रा. वनिता पाटील ह्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागात मागील ३२ वर्षापासून सेवेत असून विविध महाविद्यालय समित्यावर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मागील दहा वर्षापासून महिला तक्रार निवारण समितीच्या त्या अध्यक्षा असून अनेक चर्चासत्रे, परिसंवाद यांच्या त्या संयोजिका आहेत. त्याचसोबत बोर्ड परीक्षा, नीट, JEE च्या समन्वयक असून महाविद्यालयातील विद्यार्थिनींना सक्षम बनवण्याकरिता योगा आणि कराटे याचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना ग्रंथ देणे, त्यांची फीस भरणे त्यांना अन्य विविध प्रकारची मदत करणे हे त्यांचे सामाजिक कार्य चालू असते.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, उपाध्यक्ष माधवराव पाटील तपसे चिंचोलीकर, सचिव माधवराव पाटील टाकळीकर, सहसचिव सुनील मिटकरी, कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर, कार्यकारी संचालक प्रदीप दिंडेगावे आणि सर्व संचालक, महाविद्यालयातील सर्व समन्वयक, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
