29.5 C
New York
Sunday, July 6, 2025

धिरज विलासराव देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने  साजरा

लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवार दि. ६ एप्रिल रोजी सकाळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी लातूर शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात जाऊन श्री चा अभिषेक करून आरती केली.
त्यानंतर ग्रामदैवत सुरत शहावली दर्गा येथे चादर अर्पण केली राम मंदिर येथे पूजा करून गंजगोलाई येथील आई जगदंबेच्या मंदिरात जाऊन जगदंबा मातेची आरती केली.

यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव,दगडूआप्पा मिटकरी,गोरोबा लोखंडे, कैलास कांबळे,संभाजी रेड्डी, महादेव मुळे,प्रा. प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, ॲड. देविदास बोरुळे पाटील,विष्णुदास धायगुडे, ॲड.गोपाळ बुरबुरे, अभिजीत इगे, पवनकुमार गायकवाड,अशोक सूर्यवंशी,बब्रूवान गायकवाड, अभिषेक पतंगे, ॲड. किसन शिंदे,पिराजी साठे, युसुफ बाटलीवाला, अमोल गायकवाड, अजित सूर्यवंशी,सोमनाथ टोटाळे आदींसह लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे विविध पदाधिकारी,स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles