लातूर : उदगीर तालुक्यातील देवर्जन येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवड मंगळवारी झाली. यात मनसेचे तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे यांची अध्यक्षपदी तर नामदेव चित्ते यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सरपंच अभिजित साकोळकर, मुख्याध्यापक रितपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी चिठ्ठी टाकून करण्यात आली. या निवडीबद्दल पदाधिकाऱ्यांचे स्वागत युवा सरपंच अभिजित साकोळकर, मुख्याध्यापक रितपुरे, माजी अध्यक्ष रामस्वामी कुसळकर, जनार्दन जाधव, विनोद रोडगे, महादेव रोडगे, नरेंद्र हाडोळे, अंतेश्वर गरीबे, सोमेश्वर रोडगे, नरसिंह रोडगे यांच्यासह ग्रामस्थांनी केले.
