दिशा प्रतिष्ठान कडून गुणवंत विद्यार्थ्यांना 1 लाख 82 हजार रुपयांचे धनादेश वाटप…
लातूर : दिशा फाउंडेशन च्या वतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अर्थिक अडचणीत असलेल्या११ विद्यार्थ्यांना धनादेश देऊन पुढील शिक्षणासाठी बळ देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून गणेश देशमुख, झीशान पटेल, धनंजय देशमुख, बाळासाहेब जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले यांनी प्रतिष्ठानच्या वतीने प्रामुख्याने कार्य होत असलेल्या विद्यार्थ्याना शैक्षणिक सहकार्य कश्या प्रकारे केली जाते व फिरता दवाखाना या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू रुग्णाच्या आरोग्याची काळजी कशी घेतली जाते या बाबतची सर्व माहिती देऊन केली.
ग्रामीण भागातील केवळ हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण थांबत असलेल्या गुणवान विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देऊन चला मुलांनो घ्या भरारी हा उदात्त विचार मनाशी बाळगून गुणवंत विद्यार्थ्यांची सक्षम पिढी घडविण्यासाठी गेली तीन ते चार वर्षांपासून शेकडो विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रवेश शुल्क भरण्यासाठी मदतीचा हात देण्याचे काम दिशा प्रतिष्ठान करीत असून ही संस्था पिढी घडवण्याचे कार्य करीत आहे असे उद्गार रेणा कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील यांनी व्यक्त केले. या वेळी गणेश देशमुख यांनी ही मनोगत व्यक करताना दिशा प्रतिष्ठान च्या कार्याचा गौरव केला.
दिशा प्रतिष्ठानच्या वतीने नाईकवाडे अलीफरमान- २५०००, प्रथम स्वामी २००००, रचना रिंगणकर २००००, तांबोळी शाहनबाज२००००, रामलिंग स्वामी २००००, वाघमारे पार्वती २००००, साक्षी तिरकुळे २००००, शिंदे रमाकांत१५०००, भाग्यश्री नणंदकर ११०००, नारुळे वैष्णवी १००००, तांबोळी मुस्कान १९००, या होतकरू ११ विद्यार्थ्यांना १,८२,९००/-रुपयांचे शैक्षणिक फीस करिता सहकार्य करून त्यांच्या पंखांना बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुत्रसंचलन आशिष वांजरखेडे यांनी केले. यशस्वितेसाठी शुभम आवाड, सूरज सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
