लातूर – समाजातील दिव्यांग – अव्यंग हा भेदाभेद कमी करण्यासाठी तसेच सामाजिक सलोका निर्माण करण्यासाठी दिव्यांग – अव्यंग विवाह केलेल्या विवाहितांना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत बुधवारी 3 जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे धनादेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
सन 2024-25 वर्षातील या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यात अहमदपूर तालुक्यातील हिप्परगा येथील सोमनाथ हरिकिशन नागरगोजे, कोमल लक्ष्मण केंद्रे व लातूर येथील विजय तुकाराम मोरे, पुजा पांडूरंग भोसले तसेच राहूल बालाजी सुर्यवंशी, रेणूका राहूल सुर्यवंशी या जोडप्यांना सदरील योजनेअंतर्गत धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख ,जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, समाजकल्याण निरिक्षक विक्रम जाधव, वरिष्ठ लिपीक वर्षा जोगदंड, कनिष्ठ लिपीक शिवराज गायकवाड, प्रशांत चामे, महेश पाळणे, रामनारायण भुतडा, ज्ञानेश्वर राव, प्रदिप संमुद्रे, श्रीकांत उंबरे, गणेश पाटील यांची उपस्थिती होती. दिव्यांग – अव्यंग विवाहीत व्यक्तींनी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाशी संपर्क करुन सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी, राहूलकुमार मीना यांनी केले आहे.
20 लाभार्थ्यांना 10 लाखांचे वाटप ……
दिव्यांग – अव्यंग विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत सन 2024-25 वर्षांत 20 जोडप्यांना 10 लाखांचे वाटप करण्यात येत आहे. याअंतर्गत 25 हजारांचा धनादेश व 25 हजारांचे बचत पत्र असे एकूण 50 हजार प्रति जोडप्यांना वितरीत करण्यात येत आहेत.
